Skip to main content

Posts

महाराष्ट्र SSC दहावीचा निकाल उद्या, 13 मे रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की दहावीचा निकाल उद्या, मंगळवार (ता. 13 मे) रोजी दुपारी 1 वाजता घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा असून निकाल पाहण्यासाठी विविध अधिकृत वेबसाइट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज निकाल पाहू शकतात. यासाठी खालील अधिकृत वेबसाइट्सवर भेट देऊ शकता: www.mahahsscboard.in www.mahresult.nic.in www.msbshse.co.in www.mh-ssc.ac.in www.sscboardpune.in निकाल पाहण्याची पद्धत: वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा. 1. तुमचा सीट नंबर टाका. 2. तुमच्या आईचे नाव भरा. 3. निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही तो डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अचूक माहिती भरावी आणि अधिकृत वेबसाइट्सवरच विश्वास ठेवावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी; १६ जूनपासून नववर्षाला सुरुवात

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे २०२५ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने २९ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ला १६ जून २०२५ पासून सुरुवात होणार आहे. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना सुट्टी आणि नवीन वर्षाच्या आरंभासाठी एकसंध वेळापत्रक आखण्यात आले आहे. इतर शिक्षण मंडळांतील शाळांनीही १६ जूनपासूनच अध्यापन सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाचे मुद्दे: 1. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी २ मे २०२५ पासून लागू होईल. 2. इतर मंडळांतर्गत शाळा परीक्षा किंवा अन्य कारणांमुळे वेगळी वेळापत्रक ठेवू शकतात, मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मान्यता आवश्यक आहे. 3. नवीन शैक्षणिक वर्ष १६ जून २०२५ पासून सुरू होईल. 4. जून महिन्यातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता, २३ ते २८ जून या कालावधीत शाळा सकाळी ७.०० ते ११.४५ पर्यंतच भरवाव्यात. ३० जून २०२५ पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील. शाळांनी या वेळापत्रकाचे पालन करावे व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्य...

राज्यातील उत्तम दर्जाच्या काम करणा-या आयडॉल शिक्षकांची व शैक्षणिक संस्था निवडीसाठी समित्या स्थापन करणार

राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील प्रत्येक मुलांस गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या शाळा चालविल्या जातात. काही शाळा शासनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन द्वारे शाळा चालविल्या जातात. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील शाळांमधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणा-या शिक्षकांना त्यांच्या दर्जेदार कामाबद्दल प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे योग्य राहील. तसेच राज्यात २१ व्या शतकातील नविन आव्हाने व शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी राज्य शासन, विविध योजना कार्यान्वित करीत आहे. या योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागत आहे. ...

ऋतुरंग ' राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

 ' ऋतुरंग ' राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी चित्रकला विषयात करिअरची उत्तम संधी - शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचे प्रतिपादन देवलापार - महाराष्ट्र राज्य संघ द्वारा कलाध्यापक महामंडळ आयोजित ऋतुरंग 2024 राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विविध गटात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले. नागपूर येथील सुरेश भट सभागृहात भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रकला विषयात करिअरची उत्तम संधी असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत चित्रकला विषयात लक्ष द्यावे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले. यावेळी लता मंगेशकर हॉस्पिटलच्या संचालिका आयुषी आशिष देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्य.) रोहिणी कुंभार, राज्य अध्यक्ष नरेंद्र बारई, राज्यस्तरीय ऋतुरंगचे राज्य तथा महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धाप्रमुख दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.  या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील विद्यार्थी समर्थ संजय जैस्वाल, कनक सुरेंद्र कोडवते, आसावरी अशोक आस्वले, हर्षदा श्राव...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी

  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी देवलापार - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रामटेक तालुक्याला सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सोमवारी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांचे द्वारा बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय प्राथमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक केतन कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील शिक्षिका अंजली गणवीर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये  स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक सुनील वेळेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर उल्हास ईटनकर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. शिक्षकामधील उपक्रमशीलता वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या नवोपक्रम उपयुक्त ठरावे यासा...

स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेत सुयश

स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेत सुयश देवलापार - शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एन.एम.एम.एस. परीक्षेत स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालयातील एकूण पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात साक्षी जयराम यादव, सना सदवली कुमारी, अवनी राजू कूमरे, पलक अर्जुन वरठी व अंश किशोर बिंझाडे यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे. एन.एम. एम. एस. ही राष्ट्रीय स्तरावरील शालेय विद्यार्थी इ ८ वी मध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना आहे. त्यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असे म्हणतात. इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत प्रतिवर्षी 12000 प्रमाणे एकूण चार वर्षात 48000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. विद्यार्थ्यांचे उच्च म...

मोफत शैक्षणिक वेबसाईट तयार करणे शिका

  मोफत शैक्षणिक वेबसाईट तयार करणे शिका  आजच्या काळात वेबसाईट तयार करणे अत्यंत सोपे काम आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठमोठ्या शाळा व संस्था आपल्या उपक्रमांची, कार्यक्रमाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करतात. जगातील कोणत्याही माणसाला हि माहिती शोधणे सहज सोपे होते. शिवाय व्हाट्स अँपवर माहिती शेअर करण्यापेक्षा वेबसाईट लिंक शेअर करणे सहज सोपे असते.  त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मोफत वेबसाईट तीही फक्त अर्ध्या तासात कशी तयार करावी ते शिक्षणार आहोत.  विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. विडिओ लिंक 

10 वी 12 वी परीक्षा वेळापत्रक जाहीर

इयत्ता १२ विची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तर इयत्ता 10 विची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेबोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केला आहे   10 वी परीक्षा वेळापत्रक 10 वेळापत्रक link  12  वी परीक्षा वेळापत्रक 12 वी वेळापत्रक link   10 वी परीक्षा वेळापत्रक 12 परीक्षा वेळापत्रक व्यावसायिक अभ्यासक्रम

दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

कॉपीमुक्त परीक्षेसाठी  बोर्डाच्या शाळांना सूचना इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाने कडक पावले उचलत यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवे तसेच वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटरची सोय असायला हवी. याशिवाय सीसीटीव्हीचे फुटेज निकाल लागेपर्यंत जतन करून ठेवावे, केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल अशा सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. बोडनि यापूर्वीच सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला आहे. तरीदेखील मागच्या परीक्षेत विभागातील अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले. केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज खंडित झाल्यास जनरेटर असत्याचे लेखी स्वरूपात दिले जायचे. परंतु प्रत्यक्षात काहीच नसायचे ही वस्तुस्थिती होती. मात्र, आता शासनाने यासंदर्भातील आदेश काढला असून प्रत्येक शाळेत विशेषतः बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्यांचे फुटेज ठेवण्याची सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल...

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ शिक्षणाच्या डायनॅमिक लँडस्केपमध्ये, वाढ आणि नवकल्पना वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची कामगिरी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 2001 पासून, NCERT द्वारे आयोजित केलेल्या देशव्यापी उपलब्धी सर्वेक्षणांनी भारताच्या शालेय शिक्षण प्रणालीबद्दल गंभीर अंतर्दृष्टी प्रदान केली आहे. आता, आम्ही सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाच्या नवीन युगात पाऊल ठेवत असताना, राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र-पारख अंतर्गत पारख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ मार्गदर्शित होणार आहे. हे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सर्वेक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये नमूद केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी विशेषतः संरेखित मूलभूत, पूर्वतयारी आणि मध्यम टप्प्यांवरील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वसमावेशक मूल्यांकन करेल. 4 डिसेंबर 2024 रोजी नियोजित केलेले, हे ऐतिहासिक सर्वेक्षण 75,565 अद्वितीय शाळांना सहभागी करून घेईल, जे ग्रेड 3, ग्रेड 6 आणि ग्रेड 9 मधील 22,94,377 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि यांसारख्या गंभीर विषयांमधील कौशल्यांचे बारकाईने मूल्य...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार परिपत्रक व निकष

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार परिपत्रक व निकष जाणून घेण्यासाठी खालील  लिंकवर क्लीक करा. राज्य शिक्षक पुरस्कार परिपत्रक व निकष

राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25

  राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25 महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-२५ आयोजित करण्यात आली आहे.   संपूर्ण माहितीसाठी व पत्रकासाठी खालील लिंकवर क्लिक करा. नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ परिपत्रक सन २०२४-२५  मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या / आव्हाने यांवर आधारित नवोपक्रम,सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी उपयोगात आणलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती,  शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी नवोपक्रम हाती घेण्यात यावे, अशा प्रकारचे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत.  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.  १. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका  २. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक ३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक ४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती ५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मच...

इस्त्रोची अंतरिक्ष महायात्रा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे 14 मार्चला

  इस्त्रोची अंतरिक्ष महायात्रा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे 14 मार्चला देवलापार :-- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो व विदर्भ विज्ञान भारती मंडळ नागपूर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. ही महायात्रा देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 14 मार्चला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेसात ते पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे. सदर अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत स्पेस ओन व्हील्स ही प्रदर्शनी विदर्भातील बारा जिल्ह्यात येत आहे.स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रदर्शनेचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये वर्ग सहा ते आठ आणि नऊ ते बारा असे दोन गट केले असून ही स्पर्धा इस्त्रो याच विषयावर आयोजित करण्यात आली असून दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना इस्त्रोतर्फे प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे. देवलापार या आदिवासीबहुल भागात स्वामी विवेकानंद विद्यालय हे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्क...

स्वामी विवेकानंद विद्यालयाचा रामटेक तालुक्यात डंका

 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना स्वामी विवेकानंद विद्यालयाचा रामटेक तालुक्यात डंका विद्यालय ठरले 3 लाख रूपयांचे मानकरी देवलापार :- संपूर्ण महाराश्ट्रात अत्यंत चर्चेचा विशय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे मुल्यमापन पूर्ण झाले असून शासनाने विजयी शाळांची घोषणा केलेली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील सर्व शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आदर्ष शाळा योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना राबविण्यात आली. यात रामटेक तालुक्यातील एकूण 206 शाळांनी सहभाग घेतला. त्यात स्पर्धेच्या निकषांमध्ये बोलक्या भिंती,शालेय मंत्रीमंडळ, आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख, परसबाग, तंबाखुमुक्त षाळा, प्लॅस्टिक मुक्त शाळा यांचा समावेष होता. या सर्व निकशांची पुर्तता करत स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवलापारने प्रथम क्रमांक प्राप्त केला....

स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापारने इतिहास रचला

राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक स्पर्धेत दोन गटात प्रथम पुरस्कार  देवलापार - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजित 51 वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2023- 24 मध्ये नागपूर जिल्ह्य़ातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये  प्रथम  क्रमांकाचे स्थान प्राप्त करून नवीन इतिहास रचला.         या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील तीन प्रतिकृती ज्यांना जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्या प्रतिकृसह राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध गटामधील 400 च्या जवळपास विज्ञान प्रतिकृती सहित विद्यार्थी सहभागी झाले होते.  त्यामधील दिव्यांग प्राथमिक गटात नागपूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील उल्हास वामनराव इटानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंश विलास मरसकोल्हे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'वंश का हात सबके साथ' या प्रतिकृतीला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले. वंश दिव्यांग आहे. त्याला जन्मतः एक हाथ नसल्यामुळे दैनंदिन कामे करण्यासाठी त्याला अडचणी येत होत्या. त्यावर मात करण्यासाठी त्यान...