Skip to main content

स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापारने इतिहास रचला

राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक स्पर्धेत दोन गटात प्रथम पुरस्कार 

देवलापार - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजित 51 वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2023- 24 मध्ये नागपूर जिल्ह्य़ातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये  प्रथम  क्रमांकाचे स्थान प्राप्त करून नवीन इतिहास रचला.

        या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील तीन प्रतिकृती ज्यांना जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्या प्रतिकृसह राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध गटामधील 400 च्या जवळपास विज्ञान प्रतिकृती सहित विद्यार्थी सहभागी झाले होते.  त्यामधील दिव्यांग प्राथमिक गटात नागपूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील उल्हास वामनराव इटानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंश विलास मरसकोल्हे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'वंश का हात सबके साथ' या प्रतिकृतीला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले. वंश दिव्यांग आहे. त्याला जन्मतः एक हाथ नसल्यामुळे दैनंदिन कामे करण्यासाठी त्याला अडचणी येत होत्या. त्यावर मात करण्यासाठी त्याने मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने दिव्यांग लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपकरणे बनविली आहेत. तसेच त्याने दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी बनविलेली पहिली रॅम्प असलेली बसची चर्चा संपूर्ण विज्ञान प्रदर्शनात होती. 

 आदिवासी गटामधील प्राथमिक गटात विद्यालयातील केतन घनश्याम कामडी यांच्या मार्गद्शनाखाली आसावरी अशोक आस्वले या विद्यार्थिनीच्या मॉडर्न लाईफस्टाइल फॉर एन्व्हायरमेंट या प्रतिकृतीला सुद्धा प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे. हिने वॉटर पुरिफिकेशन करून पाण्याचा पुनर्वापर करणारे पहिले कार वॉशिंग सेंटर तयार केले होते. त्याच प्रमाणे समृद्धी हायवे वरील अपघात कमी करण्यासाठी टायर कुलिंग स्पॉट बनविले होते.        

        विद्यालयातील विद्यार्थिनी नेहरिका ठाकूरपेलने या विद्यार्थिनीने सुद्धा फ्री एनर्जी टाईल प्रतिकृती सह प्रदर्शनात सहभाग घेतला होता. गृहसुरक्षा करणारी व इलेक्ट्रिसिटी निर्माण करणारी टाईलची प्रतिकृती तयार केली होती. तिचे मार्गदर्शक शिक्षक सुनिल वेलेकर होते.

         आज पर्यंतच्या इतिहासामध्ये राज्य विज्ञान प्रदर्शनात एकाच विद्यालयातील दोन विविध गटातील प्रतिकृतींना प्रथम क्रमांक प्राप्त झालेले नाही. परंतु या वर्षी स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार या विद्यालयाने राज्य विज्ञान प्रदर्शनात दोन प्रतिकृतींना प्रथम स्थान मिळवत पहिल्यांदा हा मान प्राप्त केला. 

        विशेष म्हणजे वंश मरसकोल्हे च्या प्रतिकृतीच्या दालनाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट देऊन वंशचे कौतुक केले.

       विजेत्या  दोन्ही विद्यार्थ्यांचे व  त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. जयंतराव जी मुलमुले, कार्यवाह मा. अरविंद जी जोशी, प्राचार्य जगन्नाथ गराट, पर्यवेक्षक जयंत देशपांडे, सर्व शिक्षक बंधू भगिनी व परिसरातील पालकवर्गानी प्रशंसा केली व राष्ट्रीय स्तरावरही सहभागी होऊन यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र SSC दहावीचा निकाल उद्या, 13 मे रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की दहावीचा निकाल उद्या, मंगळवार (ता. 13 मे) रोजी दुपारी 1 वाजता घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा असून निकाल पाहण्यासाठी विविध अधिकृत वेबसाइट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज निकाल पाहू शकतात. यासाठी खालील अधिकृत वेबसाइट्सवर भेट देऊ शकता: www.mahahsscboard.in www.mahresult.nic.in www.msbshse.co.in www.mh-ssc.ac.in www.sscboardpune.in निकाल पाहण्याची पद्धत: वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा. 1. तुमचा सीट नंबर टाका. 2. तुमच्या आईचे नाव भरा. 3. निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही तो डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अचूक माहिती भरावी आणि अधिकृत वेबसाइट्सवरच विश्वास ठेवावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील उत्तम दर्जाच्या काम करणा-या आयडॉल शिक्षकांची व शैक्षणिक संस्था निवडीसाठी समित्या स्थापन करणार

राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील प्रत्येक मुलांस गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या शाळा चालविल्या जातात. काही शाळा शासनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन द्वारे शाळा चालविल्या जातात. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील शाळांमधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणा-या शिक्षकांना त्यांच्या दर्जेदार कामाबद्दल प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे योग्य राहील. तसेच राज्यात २१ व्या शतकातील नविन आव्हाने व शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी राज्य शासन, विविध योजना कार्यान्वित करीत आहे. या योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागत आहे. ...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी

  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी देवलापार - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रामटेक तालुक्याला सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सोमवारी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांचे द्वारा बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय प्राथमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक केतन कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील शिक्षिका अंजली गणवीर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये  स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक सुनील वेळेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर उल्हास ईटनकर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. शिक्षकामधील उपक्रमशीलता वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या नवोपक्रम उपयुक्त ठरावे यासा...