महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की दहावीचा निकाल उद्या, मंगळवार (ता. 13 मे) रोजी दुपारी 1 वाजता घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा असून निकाल पाहण्यासाठी विविध अधिकृत वेबसाइट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज निकाल पाहू शकतात. यासाठी खालील अधिकृत वेबसाइट्सवर भेट देऊ शकता:
www.mahahsscboard.in
www.mahresult.nic.in
www.msbshse.co.in
www.mh-ssc.ac.in
www.sscboardpune.in
निकाल पाहण्याची पद्धत:
वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा.
1. तुमचा सीट नंबर टाका.
2. तुमच्या आईचे नाव भरा.
3. निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही तो डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अचूक माहिती भरावी आणि अधिकृत वेबसाइट्सवरच विश्वास ठेवावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment