राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी
देवलापार - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रामटेक तालुक्याला सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सोमवारी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांचे द्वारा बक्षीस वितरण करण्यात आले.
जिल्हास्तरीय प्राथमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक केतन कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील शिक्षिका अंजली गणवीर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक सुनील वेळेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर उल्हास ईटनकर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
शिक्षकामधील उपक्रमशीलता वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या नवोपक्रम उपयुक्त ठरावे यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात रामटेक तालुक्यातील शिक्षकांनी सर्वाधिक पुरस्कार प्राप्त केल्याने तालुक्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिक्षकांनी मिळविलेल्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती नागपूरचे अध्यक्ष जयंत मुलमुले, सचिव डॉ. अरविंद जोशी, गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, गट विकास अधिकारी जयसिंग जाधव, स्वामी विवेकानंद विद्यालयचे प्राचार्य जयंत देशपांडे, पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी रामटेके, मंजुषा नंदेश्वर, केंद्रप्रमुख विकास गणवीर, रामनाथ धुर्वे, चंद्रशेखर मायवाडे, प्रल्हाद कोवाचे, रमेश पवार, प्रकाश महल्ले, सुरेश पडोळे, प्रमोद सुरोसे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.



Comments
Post a Comment