मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना
स्वामी विवेकानंद विद्यालयाचा रामटेक तालुक्यात डंका
विद्यालय ठरले 3 लाख रूपयांचे मानकरी
देवलापार:- संपूर्ण महाराश्ट्रात अत्यंत चर्चेचा विशय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे मुल्यमापन पूर्ण झाले असून शासनाने विजयी शाळांची घोषणा केलेली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
राज्यातील सर्व शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आदर्ष शाळा योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना राबविण्यात आली. यात रामटेक तालुक्यातील एकूण 206 शाळांनी सहभाग घेतला. त्यात स्पर्धेच्या निकषांमध्ये बोलक्या भिंती,शालेय मंत्रीमंडळ, आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख, परसबाग, तंबाखुमुक्त षाळा, प्लॅस्टिक मुक्त शाळा यांचा समावेष होता. या सर्व निकशांची पुर्तता करत स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवलापारने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयाच्या या यशात उपक्रमाचे संयोजक ज्येष्ठ शिक्षक राजू बोन्द्रे, मनोजसिंह चंदेल, वामन निचंते हे होते तर मुख्याध्यापक जगन्नाथ गराट, पर्यवेक्षक यांचे कुशल मार्गदर्शन या यशस्वीतेसाठी महत्वाचे ठरले. यांसोबत विद्यालयातील शिक्षक सुनिल वेळेकर व केतन कामडी यांच्या विशेष प्रयत्नांसोबतच सर्व शिक्षकांनी यात मोलाचे योगदान दिले. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयंतराव मुलमुले, सचिव डाॅ. अरविंद जोशी यांनी शिक्षकांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला.
एनएमएमएस परीक्षेत 14 विद्यार्थी उत्तीर्ण:--
दरवर्षी इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षेेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेत विद्यालयातील 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी स्वामी विवेकानंद विद्यालयातून उत्तीर्ण झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इन्स्पायर अवाॅर्डसाठी दोन विद्यार्थ्यांची निवड:-
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी दरवर्षी नवनवीन वैज्ञानिक शोधासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये दिले जातात. यावर्षी विद्यालयातील आराध्या सुनिल मेश्राम व श्रेया पुरूशोत्तम भुर्रे या दोन विद्यार्थीनींची इन्स्पायर अवाॅर्डसाठी निवड झाली आहे. विद्यालयाचे शिक्षक केतन कामडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रतिक्रिया
जगन्नाथ गराट, प्राचार्य
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेंतर्गत विद्यालयाला मिळालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार याचा मला अभिमान आहे. आमची शाळा सतत विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवत असते.त्यात आमचे शिक्षक मनापासून सहभाग घेतात. त्यांच्या कामाची ही पावती आहे. आम्हाला या यशाने अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.’


Comments
Post a Comment