महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे २०२५ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने २९ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ला १६ जून २०२५ पासून सुरुवात होणार आहे.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना सुट्टी आणि नवीन वर्षाच्या आरंभासाठी एकसंध वेळापत्रक आखण्यात आले आहे. इतर शिक्षण मंडळांतील शाळांनीही १६ जूनपासूनच अध्यापन सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे:
1. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी २ मे २०२५ पासून लागू होईल.
2. इतर मंडळांतर्गत शाळा परीक्षा किंवा अन्य कारणांमुळे वेगळी वेळापत्रक ठेवू शकतात, मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मान्यता आवश्यक आहे.
3. नवीन शैक्षणिक वर्ष १६ जून २०२५ पासून सुरू होईल.
4. जून महिन्यातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता, २३ ते २८ जून या कालावधीत शाळा सकाळी ७.०० ते ११.४५ पर्यंतच भरवाव्यात.
३० जून २०२५ पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.
शाळांनी या वेळापत्रकाचे पालन करावे व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
Comments
Post a Comment