Skip to main content

ऋतुरंग ' राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

 ' ऋतुरंग ' राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी


चित्रकला विषयात करिअरची उत्तम संधी - शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचे प्रतिपादन


देवलापार - महाराष्ट्र राज्य संघ द्वारा कलाध्यापक महामंडळ आयोजित ऋतुरंग 2024 राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विविध गटात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले. नागपूर येथील सुरेश भट सभागृहात भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रकला विषयात करिअरची उत्तम संधी असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत चित्रकला विषयात लक्ष द्यावे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले. यावेळी लता मंगेशकर हॉस्पिटलच्या संचालिका आयुषी आशिष देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्य.) रोहिणी कुंभार, राज्य अध्यक्ष नरेंद्र बारई, राज्यस्तरीय ऋतुरंगचे राज्य तथा महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धाप्रमुख दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. 

या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील विद्यार्थी समर्थ संजय जैस्वाल, कनक सुरेंद्र कोडवते, आसावरी अशोक आस्वले, हर्षदा श्रावण बोपटे यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर स्वप्नील शेखर चव्हाण याने द्वितीय व स्नेहल प्रकाश पारधी आणि अक्षरा संजय जैस्वाल यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच स्वामी विवेकानंद विद्यालयाला उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी विद्यालयाचे शिक्षक सुनील वेळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समिती नागपूरचे अध्यक्ष जयंत मुलमुले, सचिव डॉ. अरविंद जोशी, स्वामी विवेकानंद विद्यालयचे प्राचार्य जयंत देशपांडे, पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे व सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.





 

Comments

Popular posts from this blog

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ शिक्षणाच्या डायनॅमिक लँडस्केपमध्ये, वाढ आणि नवकल्पना वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची कामगिरी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 2001 पासून, NCERT द्वारे आयोजित केलेल्या देशव्यापी उपलब्धी सर्वेक्षणांनी भारताच्या शालेय शिक्षण प्रणालीबद्दल गंभीर अंतर्दृष्टी प्रदान केली आहे. आता, आम्ही सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाच्या नवीन युगात पाऊल ठेवत असताना, राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र-पारख अंतर्गत पारख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ मार्गदर्शित होणार आहे. हे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सर्वेक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये नमूद केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी विशेषतः संरेखित मूलभूत, पूर्वतयारी आणि मध्यम टप्प्यांवरील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वसमावेशक मूल्यांकन करेल. 4 डिसेंबर 2024 रोजी नियोजित केलेले, हे ऐतिहासिक सर्वेक्षण 75,565 अद्वितीय शाळांना सहभागी करून घेईल, जे ग्रेड 3, ग्रेड 6 आणि ग्रेड 9 मधील 22,94,377 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि यांसारख्या गंभीर विषयांमधील कौशल्यांचे बारकाईने मूल्य...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी

  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी देवलापार - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रामटेक तालुक्याला सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सोमवारी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांचे द्वारा बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय प्राथमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक केतन कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील शिक्षिका अंजली गणवीर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये  स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक सुनील वेळेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर उल्हास ईटनकर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. शिक्षकामधील उपक्रमशीलता वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या नवोपक्रम उपयुक्त ठरावे यासा...

राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25

  राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25 महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-२५ आयोजित करण्यात आली आहे.   संपूर्ण माहितीसाठी व पत्रकासाठी खालील लिंकवर क्लिक करा. नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ परिपत्रक सन २०२४-२५  मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या / आव्हाने यांवर आधारित नवोपक्रम,सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी उपयोगात आणलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती,  शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी नवोपक्रम हाती घेण्यात यावे, अशा प्रकारचे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत.  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.  १. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका  २. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक ३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक ४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती ५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मच...