राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील प्रत्येक मुलांस गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या शाळा चालविल्या जातात. काही शाळा शासनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन द्वारे शाळा चालविल्या जातात. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील शाळांमधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणा-या शिक्षकांना त्यांच्या दर्जेदार कामाबद्दल प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे योग्य राहील. तसेच राज्यात २१ व्या शतकातील नविन आव्हाने व शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी राज्य शासन, विविध योजना कार्यान्वित करीत आहे. या योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागत आहे. ...
Comments
Post a Comment