' ऋतुरंग ' राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी चित्रकला विषयात करिअरची उत्तम संधी - शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचे प्रतिपादन देवलापार - महाराष्ट्र राज्य संघ द्वारा कलाध्यापक महामंडळ आयोजित ऋतुरंग 2024 राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विविध गटात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले. नागपूर येथील सुरेश भट सभागृहात भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रकला विषयात करिअरची उत्तम संधी असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत चित्रकला विषयात लक्ष द्यावे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले. यावेळी लता मंगेशकर हॉस्पिटलच्या संचालिका आयुषी आशिष देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्य.) रोहिणी कुंभार, राज्य अध्यक्ष नरेंद्र बारई, राज्यस्तरीय ऋतुरंगचे राज्य तथा महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धाप्रमुख दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील विद्यार्थी समर्थ संजय जैस्वाल, कनक सुरेंद्र कोडवते, आसावरी अशोक आस्वले, हर्षदा श्राव...