मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना स्वामी विवेकानंद विद्यालयाचा रामटेक तालुक्यात डंका विद्यालय ठरले 3 लाख रूपयांचे मानकरी देवलापार :- संपूर्ण महाराश्ट्रात अत्यंत चर्चेचा विशय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे मुल्यमापन पूर्ण झाले असून शासनाने विजयी शाळांची घोषणा केलेली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील सर्व शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आदर्ष शाळा योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना राबविण्यात आली. यात रामटेक तालुक्यातील एकूण 206 शाळांनी सहभाग घेतला. त्यात स्पर्धेच्या निकषांमध्ये बोलक्या भिंती,शालेय मंत्रीमंडळ, आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख, परसबाग, तंबाखुमुक्त षाळा, प्लॅस्टिक मुक्त शाळा यांचा समावेष होता. या सर्व निकशांची पुर्तता करत स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवलापारने प्रथम क्रमांक प्राप्त केला....