इस्त्रोची अंतरिक्ष महायात्रा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे 14 मार्चला देवलापार :-- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो व विदर्भ विज्ञान भारती मंडळ नागपूर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. ही महायात्रा देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 14 मार्चला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेसात ते पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे. सदर अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत स्पेस ओन व्हील्स ही प्रदर्शनी विदर्भातील बारा जिल्ह्यात येत आहे.स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रदर्शनेचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये वर्ग सहा ते आठ आणि नऊ ते बारा असे दोन गट केले असून ही स्पर्धा इस्त्रो याच विषयावर आयोजित करण्यात आली असून दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना इस्त्रोतर्फे प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे. देवलापार या आदिवासीबहुल भागात स्वामी विवेकानंद विद्यालय हे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्क...