Skip to main content

Posts

10 वी 12 वी परीक्षा वेळापत्रक जाहीर

इयत्ता १२ विची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तर इयत्ता 10 विची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेबोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केला आहे   10 वी परीक्षा वेळापत्रक 10 वेळापत्रक link  12  वी परीक्षा वेळापत्रक 12 वी वेळापत्रक link   10 वी परीक्षा वेळापत्रक 12 परीक्षा वेळापत्रक व्यावसायिक अभ्यासक्रम

दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

कॉपीमुक्त परीक्षेसाठी  बोर्डाच्या शाळांना सूचना इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाने कडक पावले उचलत यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवे तसेच वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटरची सोय असायला हवी. याशिवाय सीसीटीव्हीचे फुटेज निकाल लागेपर्यंत जतन करून ठेवावे, केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल अशा सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. बोडनि यापूर्वीच सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला आहे. तरीदेखील मागच्या परीक्षेत विभागातील अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले. केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज खंडित झाल्यास जनरेटर असत्याचे लेखी स्वरूपात दिले जायचे. परंतु प्रत्यक्षात काहीच नसायचे ही वस्तुस्थिती होती. मात्र, आता शासनाने यासंदर्भातील आदेश काढला असून प्रत्येक शाळेत विशेषतः बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्यांचे फुटेज ठेवण्याची सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल...

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४

परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ शिक्षणाच्या डायनॅमिक लँडस्केपमध्ये, वाढ आणि नवकल्पना वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची कामगिरी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 2001 पासून, NCERT द्वारे आयोजित केलेल्या देशव्यापी उपलब्धी सर्वेक्षणांनी भारताच्या शालेय शिक्षण प्रणालीबद्दल गंभीर अंतर्दृष्टी प्रदान केली आहे. आता, आम्ही सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षणाच्या नवीन युगात पाऊल ठेवत असताना, राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र-पारख अंतर्गत पारख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ मार्गदर्शित होणार आहे. हे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सर्वेक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये नमूद केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी विशेषतः संरेखित मूलभूत, पूर्वतयारी आणि मध्यम टप्प्यांवरील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वसमावेशक मूल्यांकन करेल. 4 डिसेंबर 2024 रोजी नियोजित केलेले, हे ऐतिहासिक सर्वेक्षण 75,565 अद्वितीय शाळांना सहभागी करून घेईल, जे ग्रेड 3, ग्रेड 6 आणि ग्रेड 9 मधील 22,94,377 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि यांसारख्या गंभीर विषयांमधील कौशल्यांचे बारकाईने मूल्य...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार परिपत्रक व निकष

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार परिपत्रक व निकष जाणून घेण्यासाठी खालील  लिंकवर क्लीक करा. राज्य शिक्षक पुरस्कार परिपत्रक व निकष

राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25

  राज्यातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-25 महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा 2024-२५ आयोजित करण्यात आली आहे.   संपूर्ण माहितीसाठी व पत्रकासाठी खालील लिंकवर क्लिक करा. नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ परिपत्रक सन २०२४-२५  मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या / आव्हाने यांवर आधारित नवोपक्रम,सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी उपयोगात आणलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती,  शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी नवोपक्रम हाती घेण्यात यावे, अशा प्रकारचे नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत.  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.  १. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका  २. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक ३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक ४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती ५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मच...

इस्त्रोची अंतरिक्ष महायात्रा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे 14 मार्चला

  इस्त्रोची अंतरिक्ष महायात्रा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे 14 मार्चला देवलापार :-- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो व विदर्भ विज्ञान भारती मंडळ नागपूर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. ही महायात्रा देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 14 मार्चला सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेसात ते पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहे. सदर अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत स्पेस ओन व्हील्स ही प्रदर्शनी विदर्भातील बारा जिल्ह्यात येत आहे.स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रदर्शनेचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये वर्ग सहा ते आठ आणि नऊ ते बारा असे दोन गट केले असून ही स्पर्धा इस्त्रो याच विषयावर आयोजित करण्यात आली असून दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना इस्त्रोतर्फे प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे. देवलापार या आदिवासीबहुल भागात स्वामी विवेकानंद विद्यालय हे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्क...

स्वामी विवेकानंद विद्यालयाचा रामटेक तालुक्यात डंका

 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना स्वामी विवेकानंद विद्यालयाचा रामटेक तालुक्यात डंका विद्यालय ठरले 3 लाख रूपयांचे मानकरी देवलापार :- संपूर्ण महाराश्ट्रात अत्यंत चर्चेचा विशय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे मुल्यमापन पूर्ण झाले असून शासनाने विजयी शाळांची घोषणा केलेली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील सर्व शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आदर्ष शाळा योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना राबविण्यात आली. यात रामटेक तालुक्यातील एकूण 206 शाळांनी सहभाग घेतला. त्यात स्पर्धेच्या निकषांमध्ये बोलक्या भिंती,शालेय मंत्रीमंडळ, आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख, परसबाग, तंबाखुमुक्त षाळा, प्लॅस्टिक मुक्त शाळा यांचा समावेष होता. या सर्व निकशांची पुर्तता करत स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवलापारने प्रथम क्रमांक प्राप्त केला....